औंरगाबाद- एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही, तरुणांना रोजगार नाही आणि हे भाजपा सरकार १०० कोटींचे बजेट घेऊन सी एम चषकाचे आयोजन राज्यभरात करत आहे. यावरून या भाजप सरकारला राज्यातीलच नव्हे तर देशातील परिस्तितीची किती गांभीर्यता हे यावरून स्पष्ट होते. ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देत मोदी सरकारचा विरोध युवक कॉँग्रेसच्या वतीने आयोजित युवा क्रांती यात्रेत आज भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
या वेळी
व्यासपीठावर युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव, उपाध्यक्ष बी.व्ही. श्री निवास, महाराष्ट्र युवक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, शहराध्यक्ष समीर सत्तार, प्रतिभा रघुवंशी, मनीष चौधरी, भैय्या पवार, हेमंत डोगले, करण ससाणे, आदित्य पाटील, आदींची उपस्थिती होती. जोपर्यंत राहुल गांधी यांना
पंतप्रधान करणार नाही तोपर्यंत युवक कोंग्रेस स्वस्त बसणार नाही असा संकल्प करत
युवक कोंग्रेस ने भाजपवर ताशेरे ओढले. पुढच्या ७० दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता काळात पंचायत
अभियान घरोघरी युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाने
शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन राज्यात सत्तेत आल्यानंतर तातडीने केली. त्यामुळे आता
राज्यातील शेतकर्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी
केले.
दुष्काळ असताना, बेरोजगारी
असताना सीएम चषक च्या माध्यमातून राज्यभरात भाजपने आगामी निवडणुकीसाठी उद्योग सुरू
केला आहे. पण युवक कोंग्रेस आता हे सहन करणार नसून तरुणांच्या हाताला काम मिळावे
यासाठी रोजगार चषक हा उपक्रम सुरू करणार असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच
करणार असल्याचे यावेळी युवक कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी स्पष्ट
केले. उपस्थित युवक कोंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
विरोधात चौकीदार चोर है अशा घोषणा दिल्या. या वेळी कोंग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते
व्यासपीठावर न बसता युवक कोंग्रेस च्या विविध पदाधिकार्यांची भाषणे एकण्यासाठी
व्यासपीठासमोरच बसली होती. यामध्ये कोंग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल
सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार
डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेवरव पवार, रविंद्र
काळे, जितेंद्र देहाडे, जगन्नाथ
काळे यांची उपस्थिती होती.